Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड संस्थेच्या वतीने जागतिक फार्मास्टिक डे निमित्त जनजागृती फेरी…


Uruli Kanchan News उरुळी कांचन : (ता. हवेली) येथील महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट डे अर्थात औषध निर्माता दिनानिमित्त शहरात आरोग्य विषयक नागरिकांचे कर्तव्य जबाबदारी व जाणीव यासंदर्भात जनजागृती फेरी काढून वैद्यकीय शास्त्राचे महत्व आणि गरज पटवून देण्याचा अभिनव आणि आगळावेगळा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.  Uruli Kanchan News

जागतिक फार्मसी डे २५ सप्टेंबर निमित्त संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक २६ विविध सामाजिक उपक्रम हाती घेत शहरात प्रभात फेरी काढून वैद्यकीय शास्त्राचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी आरोग्य उपचार पद्धती स्वच्छता नीटनेटकेपणा काळजी संदर्भात जनजागृती करण्यात आली.

आरोग्याच्या समस्येची सामना करताना अंधश्रद्धा पासून दूर राहण्याचा तसेच वेगवेगळ्या भोंदू बाबांपासून वाचण्याचा संदेश देताना प्रत्येक आजारांची जनजागृती पुढील काळात प्रभावी प्रभावीपणे करण्याची जनजागृती करण्यात आली तसेच बीजे शिर्के शाळा यामध्ये वेगवेगळी आरोग्य विषयी प्रात्यक्षिके मुलांनी करून दाखवले आहे. Uruli Kanchan News

यावेळी समस्त ग्रामस्थांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा नीटनेटकेपणा अभ्यासातील परिपक्वता आजारांविषयीची माहिती या सर्व माहिती ऐकून विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचे महत्व मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

तसेच जागोजागी स्वच्छता करण्यात आली संस्थेच्या या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष महादेव कांचन विश्वस्त प्रतिभाताई कांचन सचिव अजिंक्य दादा कांचन कार्यकारी संचालक डॉक्टर अप्पासाहेब जगदाळे प्राचार्य डॉ विजयकुमार काळे प्रा. कुणाल हाके प्रा.सोनाली कोतवाल आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!