Uruli Kanchan : उरुळीकांचन येथील महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रम संस्थेकडून योगसाधनेचे भरगच्च कार्यक्रम! प्रचार आणि प्रसाराणे वाढवले योगाचे महत्व…!!

Uruli Kanchan : उरुळीकांचन : नैसर्गिक उपचार व योगसाधनेतून विविध विकारांवर मात करण्याची उपचारपध्दती विकसित करणाऱ्या व देशभरात नैसर्गिक उपचारांनी नावारुपास असलेल्या उरुळीकांचन येथील महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमातर्फे जागतिक योग दिन (२१ जून ) हा विविध कार्यक्रमांंनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सेवाभावी योगदानातून नैसर्गिक उपचार देण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेने यंदाचा योगदिन व्यापक स्वरुपात साजरा करुन योग दिनाचे महत्त्व पटवून देण्याचा कौतुकास्पद उपक्रम साजरा केला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने आश्रमात गेल्या ९० दिवसांपासून जिल्हास्तरावर १५ वेगवेगळ्या ठिकाणी योगसाधनेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .संस्थेच्या योग विभागाच्या प्रमुख डॉ. समृद्धी व्यास आणि व्यवस्थापक संचालक डॉ.अमेया देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भगवती वाडेकर, सतीश सोनवणे, तुषार जगदाळे आणि राहुल मेमाणे यांच्यासह योगाचार्यांच्या समर्पित चमूने कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र फुरसुंगीसाठी योग सत्र, राष्ट्रीय आयुर्वेद केंद्रातील चंद्र ध्यान आणि बायफ व प्रयागधाम, उरुळीकांचन येथील महात्मा गांधी शाळा, अस्मिता शाळा आणि अमर एज्युकेशन सोसायटी सारख्या शाळांत योग सत्रांनी या प्रवासाची सुरुवात झाली.
या संस्थेकडून योगाचे महत्व देण्यासाठी पेठ येथील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, स्पिका नॅरो फॅब्रिक लिमिटेड, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव, आणि एजे एंटरप्रायझेस यांसारख्या कॉर्पोरेट हाऊसेसनेही निरोगीपणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन योगसाधनेत सहभाग घेतला. त्याचबरोबर निसर्गोपचार आश्रमाने योग सत्रांच्या पाच दैनंदिन बॅचचे आयोजन केले. Uruli Kanchan
या सत्रांत परिसरातील दहा हजार हुन अधिक व्यक्तींनी घेतला. या सत्रांतील तीनशे हून अधिक उत्साही सहभागींना आकर्षित केलेल्या एका भव्य सामाईक योग प्रोटोकॉल कार्यक्रमाची योगदिनी सांगता झाली. या कार्यक्रमांसाठी आश्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुंभार , प्रशासक सतीश सोनवणे, शंकर चौधरी तसेच समर्पित वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अमेया देवीकर , डॉ. कुशान शहा, डॉ. गौरी, डॉ. वंदिता, डॉ. श्रावणी आणि डॉ. गणेश यांनी या सर्व व्यवस्थापनाने प्रयत्न केला.
योग साधकांनी उपस्थितांना भारावले..
महात्मा गांधी निसर्गोपचार संस्था आपल्या उपचारपध्दतीबरोबर योगासनांचे दैंंनंदिन जीवनात माणवाच्या आरोग्यात किती महत्त्व आहे हे प्रसार करण्यासाठी संस्था मोठे कार्य पेलत आहे. संस्थेच्या योग प्रशिक्षकांकडून परिसरातील काही गावांत योगसाधनांचे धडे यशस्वी गिरवले जात आहे.या योगसाधनेत सोरतापवाडीतील एक महिलांचा गट अतिशय उत्कृष्टपणे योग साधनेचे साधक झाले आहेत. त्यांनी योगदिनानिमित सादर केलेली आकर्षक योगासने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन गेलीच पण या चमुचा योगासनाबद्दल समर्पित भाव कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्र ठरला.