Uruli Kanchan : ‘उरुळीकांचन’ला मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण! वृध्द, महिलांनी वेधले उपोषणाचे लक्ष..!!

उरुळी कांचन : मराठा आरक्षणसाठीच्या जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आता उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सर्वपक्षीय साखळी उपोषण शनिवारी (ता. २८) सुरु करण्यात आले. Uruli Kanchan
उरुळीकांचन बाजार मैदान येथे बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले आहे. यावेळी अशोक मोरे, सुभाष ज्ञानोबा कांचन, तुकाराम कांचन, बाळासाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, भाऊसाहेब तुपे, अजिंक्य कांचन, राजेंद्र कांचन, मयूर कांचन, सुनिल तांबे, शरद खेडेकर उपस्थित होते. Uruli Kanchan
यावेळी सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या उपोषणाला वृद्ध, तरूण, महिला व विद्यार्थी यांच्या कडून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत या गावांमध्ये कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता येऊन भाषण करणार नाही अथवा जाहीर कार्यक्रमास हजेरी लावणार नाही अशा स्वरूपाची घोषणा देखील यावेळी ग्रामस्थांनी केली .
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही असे फ्लेक्स सध्या उरुळी कांचन येथे लावण्यात आले आहे.
यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, इत्यादी घोषणा देऊन उपोषण कर्ते पाठिंबा देत होते.