Uruli kanchan : ठेकेदाराकडे लाच मागताना उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Uruli kanchan : खाजगी ठेकेदाराकडे लाच मागताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या अधिकचा तपास केला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 04) एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. या अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. Uruli kanchan

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित असे लाच स्वीकारताना आढळून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गुप्त माहीती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आले आहे. या घटनेची सध्या सखोल चौकशी केली जाणार आहे.


Views:
[jp_post_view]