…तोपर्यंत फेटा बांधणार नाही!! पंकजा मुंडेंची मोठी घोषणा…
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक एल्गार केला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. त्या म्हणाल्या, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. बीड येथील सभेत बोलताना त्यांनी हा एल्गार केला आहे.
सध्या त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणासाठी ‘मराठा अस्त्र’ उपसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आगामी काळात त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आग्रही असतील हे स्पष्ठ झाले आहे.
राजेंद्र म्हस्के मला बोलले ताई फेटा बांधा मी म्हणाले नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळतनाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं त्यावेळी मी गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
ते आरक्षण वाचलं आणि ते परत आता कोर्टात अडकलं. आम्ही धनगर समाजाचे प्रश्न मांडले, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, तरुणांचे, बेरोजगारांचे, महिलांचे प्रश्न मिटवू, त्यांना काय तोंड दाखवायचे? असेही त्यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत त्यांना दिलेले शब्द पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत फेटा घालण्याची माझी मानसिकता नाही, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी तयारी केल्याचे बोलले जात आहे.