ब्रेकिंग! 2 फेब्रुवारीपासून विद्यापीठ, कॉलेजचे कर्मचारी संपावर…!

मुंबई : विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवदेन देण्यात आले. मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे.

तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे आता यावर तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर हे कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.