पुरंदरच्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिला शब्द!! म्हणाले, प्रत्येक गावाला भूसंपादन…


पुणे : लोहगाव विमानतळासमोरील एरो मॉल येथे ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालक सारिकाकुमारी उपस्थित होत्या.

यावेळी पुरंदर विमानतळाच्या उभारणीसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार योग्य प्रकारे काम करत आहे, अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी मोठा वाद सुरु आहे.

याबाबत ते म्हणाले, देशात कोठेही नवीन विमानतळ निर्माण करताना, राज्य सरकार जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडते. पुरंदर विमानतळासाठी देखील राज्य सरकारने प्रत्येक गावाला स्वतंत्र भूसंपादन अधिकारी नेमला आहे, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असेही ते म्हणाले.

पुण्यात विमानसेवेशी संबंधित प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्याने, या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील. विमान कंपन्यांना भविष्यात कुशल मनुष्यबळाचीआणि प्रशिक्षित तरुणांची मोठी गरज भासणार आहे. विमानसेवेची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी नवीन तेराशे विमानांची नोंदणी केली आहे. लवकरच ती दाखल होतील.

यामुळे भविष्यात विमानसेवेशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित आणि तज्ञ मनुष्यबळाची मोठी आवश्यकता निर्माण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे आता येणाऱ्या काळात पुरंदरबाबतचा वाद मिटणार की वाढणार हे लवकरच समजेल. याबाबत येथील शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!