ट्रक चालकाच्या चुकीने एका कुटुंबियातील सहा जागीच ठार , राजस्थान मधील दुर्दैवी घटना ..!!

राजस्थान : राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका ट्रकची कारला भीषण झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा अतिशय दुर्दैवी अंत झाला आहे .दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला ..
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब सवाई माधोपूर येथील गणेश मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर चुकीच्या पद्धतीने यू-टर्न घेत असलेल्या ट्रकला कार धडकल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलेही जखमी झाली असून ट्रकचा चालक फरार झाला आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ रविवारी घडलेला हा अपघाताने राष्ट्रीय रस्ते अपघातात दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा एका निष्पाप कुटुंबाला बसली आहे .
अपघातात ट्रक चालकाचा निष्काळजीपणा समोर आला असून .सीसी-टीव्ही फुटेजमध्ये कार ट्रकच्या मागे जाताना दिसत आहे. अचानक ट्रकने यू-टर्न घेतला आणि त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार त्याच्यावर आदळली. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.