उज्वल निकम यांना राज्यसभेची लॉटरी; ‘या ‘चार जणांच्या नावाची घोषणा

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित केले आहे.

ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते आता राज्यसभेतून खासदार होणार आहेत.दहशतवादी अजमल कसाबविरुद्धचा खटला लढवण्यासाठी ते ओळखले जातात.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढवली होती. जोरदार प्रचार करतानाही उज्ज्वल निकम हे दिसले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर उज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती मात्र काँग्रेसने उज्वल निकम यांच्या फेरनियुक्तिला विरोध केला होता. दरम्यान आता निकम यांचे नाव राज्यसभेवर नामांकित केले आहे.
