Ujani Dam : पुण्यात मुसळणार, नद्यांना पूर, आता उजनी भरणार; सोलापूरकरांना आनंदी आनंद…

Ujani Dam : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे.
तसेच गेल्या वर्षीही अपुरा पाऊस पडला आणि उजनी वर अवलंबून असणाऱ्या पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तीव्रतेला सामोरे जावे लागले.
यंदाही अशीच परिस्थिती उद्भवणार का? अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात होती, पण पुण्याच्या धरण साखळीत तुफान पाऊस सुरू आहे अशी बातमी रात्रभर शेतकऱ्यांच्या मनाला आनंदाची रुंजी घालत होती.
पुण्यासह नगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांनाही या बातमीने आनंदाचे उधाण आले. पुण्याच्या परिसरात व धरण साखळीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला. खडकवासला धरण कालच पहाटे तीनच्या दरम्यान भरले होते.
त्यातून दहा हजार क्यूसेक्स प्रति सेकंदाने विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला होता. आज पहाटे हा विसर्ग वाढवण्यात आला ३५ हजार ५७४ क्युसेक्स ने आज पहाटे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला.
मागील वर्षी २२ जुलै रोजी उजनी वजा २२ टक्के भरले होते. यंदाही २२ जुलै रोजी हीच परिस्थिती होती. मात्र सन २०२२२ मध्ये उजनी धरण २२ जुलै रोजी प्लस मध्ये आले होते.
गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती भासू लागल्याने यंदाही पाऊस डोळे वटारणार का? अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात होती मात्र पावसाची स्थिती निर्माण झाली आणि खडकवासला पहिले भरले. आणि शेतकऱ्यांच्या मनातील चिंता काही प्रमाणात दूर झाली.