Udhayanidhi Stalin : अस्पृश्यता संपवायची असेल तर सनातन धर्म संपवावा लागेल, उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा एकदा मोठे वक्तव्य…


Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. अस्पृश्यता संपवायची असेल तर सनातन धर्म संपवावा लागेल, असे ते म्हणाले. वास्तविक, स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. Udhayanidhi Stalin

स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्या विधानाला हे प्रत्यूत्तर दिले आहे, दुर्दैवाने आपल्या समाजात काही भेदभाव आहे. मोठ्या वर्गातील बंधू-भगिनींकडे समानतेने पाहिले जात नाही. असे करण्याचा हिंदू धर्मात कुठेही उल्लेख नाही. हे एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि ते निश्चितपणे दूर केले पाहिजे, असे राज्यपाल यांनी म्हटले होते.

या विधानाचा प्रतिवाद करताना स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) म्हणाले की, जातिभेद संपवण्यासाठीच सनातन धर्म संपवायला हवा. सनातनचा नाश झाला तर अस्पृश्यताही नष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिसच्या परिषदेत सांगितले की, आम्ही सर्वजण सामाजिक न्याय राखण्यासाठी सातत्याने लढा देत आहोत, मात्र भाजप त्यात खूप अडथळे निर्माण करत आहे.

गरीब आणि मागासवर्गीय लोकांची स्थिती सुधारावी असे भाजपला वाटत नाही. जेव्हा द्रमुकने सरकार स्थापन केले तेव्हा आम्ही सामाजिक न्याय देखरेख समिती स्थापन केली, जी सामाजिक न्याय योग्यरित्या राखली जात आहे की नाही यावर लक्ष ठेवेल. त्याचप्रमाणे सर्व राज्यांनी ‘सामाजिक न्याय देखरेख समिती’ स्थापन करावी, असे देखील ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!