उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, म्हणाले, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच….


मुंबई : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांचे नाव घेताना देखील सन्मानिय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.

तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच अशी मोठी घोषणा केली आहे.

राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी त्यांनी मला सन्मानिय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना सन्मानिय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो. अप्रतिम मांडणी राजने केलीय.

माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वजण समोर बसले. पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो.

आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्ष नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे. अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!