Uddhav Thackeray : मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, माझ्या पायाखाली टरबूज ठेवलंय याचा अर्थ समजून घ्या, उद्धव ठाकरे यांची फडणवीस, मोदींवर जोरदार टीका…

Uddhav Thackeray : पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह इतर मुद्द्यांवर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. इकडे माझ्या पायाखाली टरबूज ठेवलंय चित्रात.याचा अर्थ समजून घ्या. कालच्या पुरात पुण्यातील अनेकांचे संसार पाण्यात गेलेत.
यात निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही. पुण्यातील नदी नावांवरूनही उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोमणा मारला. नदीपात्रात टाकलेल्या भरावाचा फोटो ठाकरेंनी दाखवत मला पुणं वाचवायचे आहे. Uddhav Thackeray
आपल्या सत्तेच्या काळात ज्या प्रकल्पांना आपण स्टे दिलेला तोच भाजपने पुढे रेटलाय असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पुणे नदीसुधार प्रकल्पावरून ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हा मुठा नदी बुजवणारा कंत्राटदारही गुजरातचाच आहे.
लाडका काँट्रॅक्टर योजना राबवा आता. तुम्ही बांधलेलं संसद भवन बारा महिन्यात गळतंय त्याचा हिशेब द्या पहिले. आणि निघाले काँग्रेसला ६० वर्षांचा हिशेब मागायला. भाजपने पुणे खड्ड्यात घालवलं. गडकरी म्हणायचे की असे रस्ते बनवेन की दोनशे वर्षे खड्डेच पडणार नाहीत.
जरा तो गोवा मुंबई हायवे बघा म्हणावे त्यांना.अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह इकडे आम्हाला हिंदुत्व शिकवायला आला होता म्हणे. एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचे बालपण मुस्लीम कुटुंबासोबत गेले होतं म्हणे. तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर चालते. मग मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.