Uddhav Thackeray : विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली स्टार प्रचारकांची घोषणा, २४ नेत्यांचा समावेश…


Uddhav Thackeray : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ३२ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३२ समन्वयक विभागवार असणार असून ७ मुख्य समन्वयकांची नियुक्ती देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

यासह आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. २४ स्टार प्रचारकांची नाव जाहीर करण्यात आली आहे.

या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, नितीन बानगुडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन आहिर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर यांची नावं आहे. तर याबरोबर ज्योती ठाकरे, संजना घाडी, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, आनंद दुबे, किरण माने, प्रियांका जोशी, लक्ष्मण वडले यांचा देखील समावेश करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!