दोन गटात उरुळी कांचन येथे तुंबळ हाणामारी, ८ जणांवर गुन्हा दाखल, घटनेने खळबळ..

उरुळी कांचन : किरकोळ वादातून दोन गटात लाकडी दांडक्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह एकूण ८ जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संतोष दादाराम चव्हाण (वय 28, व्यवसाय मजुरी रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन ता.हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय झोंबाडे, लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे (रा. सर्वजन गोळेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अक्षय सुनिल झोंबाडे (वय 25, व्यवसाय ड्रायव्हर रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यश चव्हाण, (रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली), सार्थक जाधव (रा. उरूळी कांचन) मोन्या जाधव (रा. जुनी तांबेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) सानु अन्सारी रा. उरूळी कांचन ता. हवेली) यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अक्षय झोंबाडे, लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे हे चव्हाण यांच्या घरी येऊन तुमचा मुलगा यश चव्हाण हा त्याच्या मित्रांना घेवुन आमच्या घरी का आला.

या कारणावरून भाऊ शंकर चव्हाण व संतोष चव्हाण यांना अक्षय झोंबाडे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच भावजय वनिता यांना लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे यांनी हाताने मारहान करून शिवीगाळ व दमदाटी केली. अशी तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर 232/2025 भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत अक्षय झोंबाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यश चव्हाण, सार्थक जाधव, मोन्या जाधव व सानु अन्सारी हे चौघे घरासमोर येवुन पुतन्या बाळु याला मारहाण करीत होते. यावेळी त्यांना शिवीगाळ, दमदाटी, व मारहाण का करता असे विचारले असता या कारणावरून मोन्या जाधव याने त्याच्या हातातील लाकडी काठीने पाठीवर मारहाण करून आपखुषीने दुखापत केली. तसेच किरकोळ जखमा केल्या आहेत. तसेच बहीन सोनाली हीस यश चव्हाण व सार्थक जाधव, सानु अन्सारी यांनी शिवीगाळ,दमदाटी केली असल्याची तक्रार देण्यात आली आहे.