पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणात ट्विस्ट ; तरुणीनेच बनाव रचल्याच निष्पन्न, अखेर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणींन तिच्यावर डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून अत्याचार केल्याची तक्रार दिली होती.या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारदार तरुणीनेच बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर तिच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयने अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे आरोपीने महिलेच्या मोबाईल मधून स्वतःचा सेल्फी काढून मी पुन्हा येण्याचा मेसेज ठेवून ठेवला होता. कुरिअर बॉयच्या बहाण्याने तोंडावर स्प्रे मारुन घरात शिरला आणि आपल्यावर अत्याचार केले, असा आरोप तरुणीने केला होता. तरुणीने पोलिसांत तशी तक्रार दाखल केली आणि त्यावरून तीन जुलै रोजी गुन्हाही नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी 250 कॅमेरे तपासून आणि तिचा मोबाइल डेटा रिकव्हर करून केलेल्या तपासात, तरुणीनेच ओळखीच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्याबरोबर फोटो काढले होते. त्यानंतर फोटो एडिट करुन त्यावर धमकीचा मजकूर टाकला होता. आरोपी तरुण वर्षभरापासून तिचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले होते.तरुणीने स्वतःच फोटो एडिट करून पोलिसांची दिशाभूल केली. एडिट केलेला फोटो मोबाइलमध्ये ठेवून मूळ फोटो डिलिट केला. पोलिसांनी दाखवलेल्या सीसीटीव्हीमधील चेहरा ओळखूनही माहिती नसल्याचे सांगितले. डॉक्टरांनाही खोटी माहिती दिली.
दरम्यान या तरुणीने हा खोटा आरोप का केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तिने हा प्रकार हेतूपुरस्सर आणि योजनाबद्धपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात तरुणीनेच मनावर असल्याचे निष्पन्न झाल्याने केस उलट फिरली.
