ट्रकच्या अपघातात तीन बस उलटल्या ;14 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी….!
भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहनिया बोगद्याजवळील बड़ोखर गावाजवळ हा अपघात झाला. रेवा-सिधी बोगद्याजवळ हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भरधाव वेगात आलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन बसेसवर धडकली. दोन बस उलटल्या, तर तिसऱ्या बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात भीषण असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना रेवा येथे रेफर करण्यात आले आहे.
ट्रकने बसला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावात ही घटना घडली.
रीवाचे एसपी, पोलीस अधीक्षक मुकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, एकूण 50 जण जखमी झाले आहेत. यातील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. यानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असे ते म्हणाले.