त्रिपुरा, मेघालय व नागालॅंड राज्यांच्या निवडणूका जाहीर…!
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या या तीन राज्यातील विधानसभांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
2 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत.
2018 प्रमाणे यावेळीही तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होऊ शकतात. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत.
Views:
[jp_post_view]