त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर….!

आगरताळा : भारतीय जनता पार्टीने त्रिपुरा विधानसभेसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काल या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री बिप्लब देव चौधरी यांचे नाव उमेदवार यादीत नसल्याने समर्थकांना धक्का बसला.

केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक समितीने त्रिपुरातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी खालील नावांना मान्यता दिली आहे.

टाउन बोर्डोवाली – डॉ. माणिक साहा
मोहनपुर- रतन लाल नाथ
बामूटिया (अजा)-कृष्णाधन दास
बरजला (अजा)- डॉ. दिलीप कुमार दास
खैरपूर- रतन चक्रबोर्ती
रामनगर- सुरजीत दत्ता
बनमालीपूर- राजीव भट्टाचार्जी
मजलिशपूर- सुशांत चौधुरी
प्रतापगढ़ (अजा) – रेबती मोहन दास
बादारघाट (अजा)- मिनारानी सरकार
कमलासागर- अंतरा देव सरकार
बिशालगढ़- सुशांत देव
गोलाघाटी (अजजा)- हिमानी देववर्मा
चोरीलाम (अजजा)- जिष्णु देववर्मा
बौक्सनगर- तफ्फजल होस्सैन
नलचर (अजा) – किशोर बर्मन
सोनामुरा- देवब्रता भट्टाचार्जी
धनपूर- प्रतिमा भोमिक
खोवाई- सुब्रतो मजुमदार
कल्याणपूर प्रमोदनगर – पिनाकी दास चौधरी
तेलियामरा-कल्याणी दास
