Traffic Rule : महत्त्वाची बातमी! राज्यात आता दुचाकीस्वासासह सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती, अन्यथा दंड लागणार भरावा….

Traffic Rule : विधानसभा निवडणूक संपताच राज्यातील अपघाताची संख्या राज्य सरकारच्या लक्षात आली असून त्यामुळे राज्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना नव्याने आदेश दिले आहेत.
वाहतूक नियभंगाच्या केस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ई-चलन मशीन’ मध्ये विना हल्मेट दुचाकीस्वार व विनाहेल्मेट सहप्रवासी या दोन्ही केसची कारवाई या एकाच ‘हेड’ खाली केली जात होती. त्यामुळे विनाहेल्मेट सहप्रवासी व विनाहेल्मेट दुचाकीस्वार यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.
त्यामुळे आता या ‘ई-चलन’ मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विनाहेल्मेट सहप्रवासी अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे दोन्हीची स्वतंत्र माहिती मिळणार आहे. Traffic Rule
दरम्यान, याकरता नव्या नियमानुसार वाहतूक पोलिसांकडे दिलेल्या इ चलन मशीन मध्ये तातडीने बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहप्रवाशाच्या हेल्मेट नसण्याच्या कृतीस आवश्यक त्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढील काळात कोणीही अशा स्वरूपात हेल्मेट नसताना दुचाकीवर बसलेले आढळून आल्यास त्यांना मोठ्या दंडास सामोरे जावे लागणार आहे.