TPG Nambiar : टीव्हीचा जनक गेला!! घरोघरी टीव्ही पोहचवणारे टी. पी.जी. नांबियार यांचे निधन..


TPG Nambiar : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बीपीएल समूहाचे संस्थापक टी. पी. गोपालन नांबियार यांचे गुरुवारी प्रदीर्घ काळ सुरू राहिलेल्या प्रकृती अस्वास्थ्यातून गुरुवारी सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे टीपीजी हे सासरे आहेत.

ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ८० आणि ९० च्या दशकातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बीपीएलची नांबियार यांनी १९६३ मध्ये ‘लायसन्स राज’ दरम्यान स्थापना केली. कंपनीने सुरुवातीला भारतीय संरक्षण दलांसाठी हर्मेटिकली सीलबंद अचूक पॅनेल मीटर तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पलक्कड, केरळ येथे बीपीएलची पहिली उत्पादन सुविधा सुरू झाली, परंतु नंतर बेंगळुरू येथे प्रकल्प स्थलांतरित करण्यात आला. TPG Nambiar

भारतातील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक या उद्योगाची पायभरणी करण्याचे काम जर कोणी केले असले तर ते नांबियार यांनी. नांबियार यांनी १९६३मध्ये केरळमधून औद्योगिक कार्याची सुरुवात केली. संरक्षणक्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती आणि पुरवठा सुरू करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश फिजिकल लॅबोरॅट्रीज या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपकरणांची निर्मिती सुरू केली.

१९८२मध्ये देशात आशियायी क्रीडा स्पर्धा झाल्या, आणि देशात रंगीत टीव्हीचे आगमन झाले. नांबियार यांनी ही संधी हेरत टीव्ही आणि व्हीसीआरची श्रेणी लाँच केली. बंगळुरूतील पलक्कड येथील त्यांच्या कारखान्यात हे टीव्ही बनत. टीव्हीला मिळत असलेल्या यशातून त्यांनी फ्रिज, वॉशिंग मशिन यांची निर्मिती सुरू केली. बघता बघता भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक ब्रँड म्हणून बीपीएलचे नाव सर्वतोमुखी झाले. कंपनीचा टर्नओव्हर हा २५०० कोटींपर्यंत पोहोचला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!