पुणे विमानतळावर मोठी खळबळ! ७५ वर्षांच्या आजीने विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी, अन् अधिकाऱ्यांची धावपळ..


पुणे : पुणे विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेनं दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नीता कृपलानी ही महिला विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आली. तिने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे सांगितले.

त्यामुळं तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचं स्पष्ट झाले.

‘या’ कारणामुळं दिली धमकी..

या महिलेनं अशी धमकी का दिली याचे कारणंही समोर आलं आहे. सुरक्षा तपासादरम्यान वेळ लागत असल्यानं वैतागल्यानं या महिलेनं आपल्या शरिरावर चारही बाजूने बॉम्ब लावले असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगितले.

पुणे ते दिल्ली या फ्लाईटनं ही महिला प्रवास करणार होती. या महिलेवर गुन्हा दाखल झाला असून तिला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!