काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू असे म्हणाले, लोकं स्वर्गात गेली, तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं..!!!!


जम्मू काश्मीर : येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० पेक्षा अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी म्हणालेले दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर बनवू. जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं. उद्या हे लोक 27 जणांच्या घरी जाऊन सांगतिल की, नंदनवनात त्यांचा मृत्यू झाला ते स्वर्गात गेले, अशी जहरी टीका त्यांनी केली.

जसं कुंभमेळ्याच्यावेळी सांगितलेलं, जे मेले त्यांना मोक्ष मिळाला. मेलेले लोक गोमूत्र पाजून जिवंत होणार नाहीत. फडणवीस म्हणतात करारा जबाब देंगे, गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का? अशी टीका संजय राऊत यांनी केली. यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून देशात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यात नौदलाच्या एका २६ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विनय नरवाल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेने त्यांच्या गावी एकच शोककळा पसरली आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. करनालच्या सेक्टर-7 मध्ये राहणारे विनय दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते आणि सध्या लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

तसेच राऊत म्हणाले की, अहो, मुस्लिम सुद्धा मारले गेलेत. हे नवीन गोष्टी सोडतील. धर्म विचारला असेल, तर त्याला भाजपच द्वेषाच राजकारण जबाबदार आहे. देशात द्वेषाच राजकारण सुरु आहे, ते बूमरॅग होऊ शकते. जे झाले, त्याला भाजपच घाणेरडं, द्वेषाच राजकारण जबाबदार असल्याचे देखील राऊत म्हणाले.

आमचे 27 ते 30 भाऊ मारले गेले, याला अमित शाह जबाबदार नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. अमित शहा यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, तरच सर्वपक्षीय बैठकीला अर्थ असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!