ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात ; शरद पवारांची फडणवीसांवर जोरदार टीका…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकमध्ये एकनिपाणीत प्रचारसभेत बोलताना ‘राष्ट्रवादीचं पार्सल’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावर आता शरद पवारांनी ‘ फडणवीस काहीही बोलू शकतात, त्यांचे ते वैशिष्ट्य’ असे म्हणत टीका केली आहे.
कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली खोचक टिप्पणी यामुळे शरद पवार पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत.
यामुळे कर्नाटकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी निपाणीतील प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा केला होता.
यावर शरद पवार, जयंत पाटील यांनी आता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते काहीही बोलू शकतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात. त्यामध्ये काही लोक वाक्बगार असतात. आजच मी इथे आल्यावर बघितलं, असेही शरद पवार म्हणाले.