Theur : चिंतामणीच्या दर्शनासाठी थेऊर येथे भाविकांची गर्दी, संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन..

Theur उरुळी कांचन : थेऊर (ता. हवेली) येथे आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पुजारी आगलावे यांनी पहाटे श्रींची पूजा केली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा केली. Theur

चिंचवड देवस्थान व आगलावे बंधूच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आले होते . तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाणाची व्यवस्था करणात आली होती. दुपारी देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी व चिवडा महाप्रसाद देण्यात आला.
याठिकाणी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. सायंकाळी ह.भ.प संतोष महाराज कांबळे इंदापूर यांचे कीर्तन झाले. रात्री चंद्रोदयानंतर श्रीचा छबिना निघालानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता. ग्रामस्थांच्या वतीने पार्किंग व्यवस्था केली होती. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करणात आली होती. सर्व व्यवस्थेवर विश्वस्त आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून होते.
