मध्यरात्रीनंतर महिलांकडून ‘या’ वस्तूंची सर्वाधिक ऑनलाइन ऑर्डर; डिलिव्हरी बॉयने उघड केलं मोठं रहस्य


पुणे : सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत असून, घरबसल्या काही मिनिटांत आवश्यक वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. किराणा सामानापासून ते कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थांपर्यंत जवळपास सर्वच गोष्टी आता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत.

विशेषतः महानगरांमध्ये धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण दुकानात जाण्याऐवजी ऑनलाइन ऑर्डर करण्याला प्राधान्य देत आहेत. दिवस असो वा रात्र, 24 तास उपलब्ध असलेल्या या सेवांमुळे ग्राहकांचा वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होत आहे. अनेकदा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू सवलतीच्या दरातही मिळत असल्याने त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात फूड डिलिव्हरी अॅप्सचा वापर करतात. विशेषतः स्वयंपाक करण्याऐवजी अनेक जण थेट ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवण्याला पसंती देतात.

दरम्यान, एका डिलिव्हरी बॉयने यासंदर्भात एक रंजक माहिती समोर आणली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा महिला ग्राहकांकडून वेफर्स, बिस्किटे, बर्गर, पिझ्झा आणि इतर स्नॅक्सच्या ऑर्डर्सचे प्रमाण लक्षणीय वाढते. विशेषतः रात्रीच्या वेळेत येणाऱ्या ऑर्डर्समध्ये महिला ग्राहकांचे प्रमाण अधिक असल्याचा दावा त्याने केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!