‘या’ ६ टिप्स अतिशय महत्वाच्या! पालन केले तर पैसा तुमच्यामागे धावू लागेल, जाणून घ्या..


आपल्या आयष्यात आर्थिक बाबींचे नियोजन असणे गरजेचे आहे. यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे आणि काही मूलभूत टिप्सचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या टिप्सचे काटेकोरपणे पालन केले, तर पैसा तुमच्यामागे धावू लागेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र होऊ शकाल. आर्थिक स्वावलंबन आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे.

यामुळे याबाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त नोकरीवर अवलंबून असाल तर फक्त नोकरीवर अवलंबून न राहता कमाईचे इतर पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. घरबसल्या काही वस्तू बनवणे, एखादा छोटा जोडधंदा सुरू करणे किंवा ‘फ्रीलान्स’ काम करणे हे चांगले पर्याय ठरू शकतात. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

तसेच आर्थिक स्थिरता येईल. एकाच स्रोतावर अवलंबून राहणे नेहमीच धोकादायक ठरू शकते. समजा नोकरी गेली तर हा पर्याय तुम्हाला उंचीवर नेवू शकतो. तसेच किमान दोन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून बाजूला काढून ठेवा. नोकरी गमावल्यास किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही रक्कम कामाला येईल.

यासाठी तुमच्या एकूण उत्पन्नाच्या ३ ते ६ महिन्यांपर्यंतच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून तयार ठेवा. हा निधी तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित संकटातून बाहेर पडण्यास मदत करेल. तसेच उपयोगात नसलेले पैसे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, एसआयपी (SIP) किंवा सोने यांसारख्या विविध पर्यायांमध्ये गुंतवा.

याबाबत मात्र योग्य माहिती हवी, चांगल्या परताव्यासाठी नियमित गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. विविध गुंतवणुकीचे पर्याय शोधून त्यानुसार गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. तुमचे वय २१ ते ३९ वर्षांच्या दरम्यान असेल, तर आत्तापासूनच निवृत्तीसाठी बचत सुरू करा. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल, तितका फायदा तुम्हाला मिळेल.

निवृत्तीसाठी बचत करणे म्हणजे भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आत्तापासूनच तयारी करणे. यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक चिंता राहणार नाही. जर तुमच्याकडे जास्त व्याजदराचे कर्ज असेल, तर ते आधी फेडा. उच्च व्याजदराचे कर्ज तुमच्या आर्थिक प्रगतीला अडथळा आणू शकते. कर्जाची लवकर परतफेड केल्याने तुमचे मासिक खर्च कमी होतील.

तसेच तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी अधिक पैसे उपलब्ध राहतील. आर्थिक स्वातंत्र्यासाठी कर्जमुक्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या एकूण कमाईतील ७ ते १० टक्के रक्कम मौजमजेसाठी, प्रवासासाठी किंवा तुमच्या आवडीनिवडीसाठी बाजूला काढा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि आर्थिक नियोजनाचा कंटाळा येणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!