हवेलीतील यशवंत सहकारी कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैरव्यवहार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवाराचं स्पष्टीकरण

पुणे : गेली 14 वर्ष राजकीय इच्छाशक्तींचा बळी ठरलेल्या व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या शब्दाने कारखान्याच्या पुनर्जीविताचा शब्द मिळालेल्या हवेलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवेलीतील यशवंत सहकारी कारखान्याच्या बाबतीतील आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल आहे.

व्हीआयपी सर्किट हाऊस मध्ये विविध विभागांच्या आढावा बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी यशवंत सहकारी कारखान्याबाबत आढावा बैठकीत चर्चा केली. यावेळी त्यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्याची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा व्यवहार पणन विभाग आणि सहकार विभाग यांच्याशी संबंधित आहे. या दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून त्या हवेली तालुक्यातील आहेत.आता या व्यवहाराचे योग्य मूल्यांकन काढण्यात आले आहे आणि सर्व व्यवहार चेकद्वारे होणार आहे. यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल आहे.
या बैठकीत बोलताना ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. ते कसे पैसे उपलब्ध करून देणार आहेत, कशा पद्धतीने संचालक मंडळ पुढे जाणार याची चर्चा झाली आहे. तसेच त्यांना ज्या काही राज्यस्तरावरील आणि साखर आयुक्त स्तरावरील काही अडचणी आहेत. त्या दूर करण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत असं त्यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला सहसा कोणी आव्हान देऊ शकत नाही. हा निर्णय योग्य असल्याने त्याला चुकीचं म्हणण्याचं कोणतंही कारण नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं
