पार्थ पवारांवर गुन्हा नाही, मग माझ्यावरच….. ठाकरे गटाच्या माजी खासदाराला अटक होण्याची शक्यता , काय आहे प्रकरण?


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. कुठल्याही क्षणी उन्मेष पाटील यांच्यासह दोघांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

उन्मेष पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला. बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं, त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आलं आहे” असं उन्मेष पाटील आपली बाजू मांडताना म्हणाले आहेत.मला विचारायचं आहे, पार्थ पवार 99% भागीदार तिथे गुन्हा दाखल होत नाही. मग माझ्यावरच का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावाने बी. एच. आर. चे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात खरेदी केल्या जातात. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात? त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? मग माझ्यावरच का झाला? असे प्रश्न उन्मेष पाटील यांनी विचारले आहेत. राजकीय सुड ठेवून मला अडकवलं जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!