बीड लोकसभा निवडणूक पुन्हा रक्तरंजित ! अजित पवार गटाच्या सरपंचाचा गोळ्या घालून निर्घून हत्या , परळीत प्रचंड तणावाचे वातावरण ..!!


 

बीड :  बीड लोकसभा निवडणुकीच्या वादातून परळीच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंदळे यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पाच जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वातावरण चांगलेच तणावाचे आहे. त्यामुळे परळीत प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीडच्या परळीत शनिवारी रात्री लोकसभा निवडणुकीच्या कारणावरुन गोळीबार करण्यात आला. या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांचे समर्थक ग्यानबा गित्ते जखमी झाले आहेत. शहरातील बँक कॉलनीतील ही घटना आहे. सध्या जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. सध्या ते परळीत ठाण मांडून आहेत.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!