… तर मी राजीनामा दिला असता!! खासदार सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं वक्तव्य


बीड : येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकरणी विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केले आहे. असे आरोप माझ्यावर झाले असते तर नैतिकता म्हणून सगळ्यात आधी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर नैतिकतेनं मी पहिल्याच दिवशी मी पक्षाकडे माझा राजीनामा दिला असता, मी इथं पक्ष वाढवायला आली आहे. पक्षाला अडचणीत आणायला नाही. माझ्यामुळे पक्षाची रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेतलं असतं. माझी इन्क्वायरी करा, दूध का दूध और पानी का पानी, होऊ द्या, असं मी केलं असतं. असे ते म्हणाल्या आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती. त्यांना वर्षे-वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. संतोष देशमुख प्रकरणात तर अनेक पुरावे आहेत. सत्तेतले लोकही याबाबतचे आरोप करतायत. आम्ही विरोधक आहोत, त्यामुळे आमचा बायस आहे, असं आपण गृहीत धरू, पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक याबाबतचा आरोप करत आहेत.

दरम्यान, मंगळवारी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने किंवा अजित पवारांनी सांगितलं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी आमदारांच्या बैठकीत केल्याची माहिती आहे. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!