तरुणावर आधी कोयत्याने सपासप वार; मग दगडानं डोकं ठेचून मारलं, पुण्यात अठरा वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या…


पुणे : विद्येचं माहरेघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. विश्रांतवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हेगारीचा भयानक चेहरा समोर आला आहे. एका १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

जुन्या भांडणाचे पर्यवसान या भीषण हत्याकांडात झाल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कॉमर्स झोन भागात रात्री ११:३० ते १२:३० च्या सुमारास ही घटना घडली असून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गौरव गणेश तेलंगी (वय १८) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. मध्यरात्री गौरव परिसरात असताना, आरोपींनी त्याला गाठले आणि त्याच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी केवळ हल्लाच केला नाही, तर क्रूरतेची सीमा ओलांडली. ३ ते ४ जणांच्या टोळीने आधी गौरवावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तो जिवंत राहणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी जवळील दगडाने त्याचे डोके ठेचले.

या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. भरवस्तीत आणि मध्यरात्री झालेल्या या भयंकर खुनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!