बीडमध्ये खळबळ! तरुणाने विवाहितेला घरी कोण नसल्याचे बघून जे केलं…, आरोपीवर गुन्हा दाखल..

बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने अगोदर सतत फोन करून वीस वर्षीय विवाहितेचा संसार मोडला. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महेश अजिनाथ राख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी महेश हा सतत फोन करून या विवाहितेला त्रास द्यायचा. या तरुणामुळे तिचा संसार मोडला. त्यानंतर तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडले.
संबंधीत पीडित तरुणी तिच्या माहेरी राहत होती. तिच्या माहेरच्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने या विवाहितेचं तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणीच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार,आरोपी महेश राख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.