”चौपाटी राजा” नावाने कुप्रसिद्ध असणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून बेड्या..

लोणी काळभोर : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी, “बचक्या” टोळीतील सराईत व ”चौपाटी राजा ” या नावाने कुप्रसिद्ध असणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन्स जवळ अटक केली आहे.

राजेश उर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९, सध्या रा. पठारे वस्ती, कदमवाकस्ती ता. हवेली, मूळ रा. दरबंगा, बिहार राज्य) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहीद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मंडळ या अट्टल गुन्हेगारावर बंड गार्डन पोलिस ठाण्यात ६, लष्कर व विश्रामबाग पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
गुन्हे शाखेचे पथक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना एका खबऱ्यामार्फत ”चौपाटी राजा ” नावाने कुप्रसिद्ध असलेला गुन्हेगार पुणे सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन जवळ थांबला आहे. अशी माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. राजेश मंडळ हा “चौपाटी राजा” नावाने कुप्रसिद्ध असुन दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणारी सराईत “बचक्या” टोळीशी संबंधीत असुन सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पुढील कारवाईसाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स 24 मार्शल अंमलदार तुळशीदास जाधव व महेंद्र आगळे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे.