दीड लाखांसाठी आईने केली भयंकर डील, पोटच्या लेकीला हॉटेलमध्ये नेलं अन्…; संतापजनक प्रकार आला समोर


नवी मुंबई : कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक परस्थिती कमकुवत असल्यामुळे जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्याला पुढे करून पैसे कमविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

दलाल शहरोज अली उर्फ सोनू इर्शादअली सय्यद (वय. ३१) आणि ४३ वर्षीय महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी महिला ही कोपरखैरणेमध्ये राहत होती. महिलेने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीला दीड लाख रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या महिलेला तसेच तिच्या अल्पवयीन मुलीला वेश्यागमनासाठी ग्राहक शोधून आणणाऱ्या दलालाला अटक केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी वेश्यागमनासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. सोनू नामक दलाल दीड लाख रुपयांच्या बदल्यात अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी ग्राहकांच्या शोधात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

सदर माहितीच्या पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलाल सोनू याच्यासोबत संपर्क साधला होता. यावेळी दलाल सोनू याने अल्पवयीन मुलगी पुरविण्याची तयारी दर्शवून त्याच्या संपर्कात असलेली महिला तिच्या अल्पवयीन मुलीला दीड लाख रुपयांमध्ये ग्राहकासोबत शरीरसंबंधासाठी पाठविण्यास तयार असल्याचे सांगितले.

बनावट ग्राहकाने त्यास होकार दिल्यानंतर दलाल उर्फ याने सायंकाळी ७ वाजता महापे एमआयडीसीतील सुयोग हॉटेल समोरील बस स्टॉपजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी महापे एमआयडीसीतील सुयोग हॉटेलसमोर सापळा लावला होता.

यावेळी दलाल सोनू रिक्षामधून अल्पवयीन मुलीला तिच्या आईसोबत तिथे घेऊन आल्यानंतर बनावट ग्राहकाने आपल्याजवळ असलेली दीड लाख रुपयांची रक्कम त्याला दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची धरपकड केली.

त्यानंतर पोलिसांनी सोनू तसेच आपल्या मुलीला वेश्याव्यवसायासाठी आणलेली ४३ वर्षीय महिला या दोघांना पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना अटक तसेच अल्पवयीन मुलीची सुटका केली.

दरम्यान, या कारवाईत अटक करण्यात आलेल्या महिलेची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावल्याने तिला १ लाख रुपयांची गरज असल्याचे तिने दलाल सोनू याला सांगितले होते. त्यावेळी सोनू याने व्हर्जीन असलेल्या तिच्या १७ वर्षीय मुलीने शरीरसंबंध केल्यास तिला १ लाख रुपये मिळू शकतात, असे सांगितले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीला वेश्यागमनास पाठविण्याची तयारी दर्शविली होती.

त्यानंतर सोनू याने दीड लाख रुपयांमध्ये अल्पवयीन व्हर्जीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या ग्राहकाचा शोध सुरु केला होता. मात्र, पोलिसांना ती बाब वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सदर प्रकार उघडकीस आणला. असून महिलेसह दलाला देखील गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!