मोबाइल ठरला त्या दोघांच्या आयुष्यातला शेवट, नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून भांडण, नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..


भोपाळ : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बोटनपुरवा परिसरामध्ये पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या जोरदार भांडणनंतर पतीला जीव गमवावा लागला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हे भांडण मोबाईलमुळे झाले होते. या भांडणामुळे पत्नी बहिणीच्या घरी निघून गेल्यामुळे नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हनुमान घरामध्ये एकटा असल्याने शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. हनुमानचा मृतदेह छताला लटकताना पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यानंतर हनुमानचा भाऊ संतारामने याची माहिती पोलिसांना कळवली.

दरम्यान, हनुमान कश्यप असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हनुमानचा दोन दिवसापूर्वी मोबाईल हरवला होता. मोबाईलचा शोध घेतल्यानंतर त्यांनी पत्नीला विचारले. मात्र पत्नीकडे मोबाईल नव्हता.

हनुमानला असे वाटत होते, की त्याच्या पत्नीला मोबाईलविषयी माहिती आहे. परंतु पत्नी सांगत नसल्याने त्यांच्या दोघांमध्ये जोरदार कडाक्याचं भांडण झाले. त्यानंतर पत्नी बहिणीच्या घरी निघून गेली.

पत्नी सोबत झालेल्या वादामुळे हनुमान यांनी गळफास घेतला असे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी सांगितले. याबाबत सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!