महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या उरुळीकांचन येथून ‘महिला उन्नती वारी-२०२६’ उपक्रमाचा शुभारंभ; वारीत शासकीय योजनांबाबत होणार जनजागृती..

पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत आषाढी वारी-२०२६ निमित्त दि. ८ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर महिला व बाल विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे प्रत्येकी एक असे दोन डिजिटल चित्ररथ जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून महिलांविषयक विविध कायदे, महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील डिजिटल चित्ररथाचा उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उरळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.
‘महिला उन्नती वारी-२०२६’ उपक्रमाच्या माध्यमातून वारी मार्गावरील महिला, वारकरी आणि नागरिकांमध्ये महिलांच्या हक्क, सुरक्षा, कायदे आणि विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
