आरक्षणाचा मुद्दा पेटला ; मनोज जरांगे लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना, मोर्चापूर्वी अंतरवाली सराटीतून एल्गार करत थेट मुख्यमंत्र्यांनाच….


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.मुंबईच्या आझाद मैदाना ते उपोषणाला बसणार आहेत. मोर्चापूर्वी त्यांनी अंतरवाली सराटीतून आंदोलकांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

मी मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार आहे. मुंबईत आल्यावर मला गोळ्या झाडा,आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत,याला तुम्ही जबाबदार आहात असा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.जरांगे म्हणाले, ‘काल लातूरमध्ये एका तरुणाने पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण असे करू नका, तुम्ही मराठ्यांना अडवलं आहे. गॅझेट्स आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत. मुख्यमंत्री साहेब मराठ्यांचा संयम ढासळून देऊ नका. असं जरांगेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या मोर्चासाठी ४० अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. प्रवासा दरम्यान आक्षेपार्ह घोषणा, जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होऊ नये.जाहीर केलेला मार्गच वापरावा; प्रवासादरम्यान मार्ग बदलू नये.
रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.प्रवासादरम्यान जर खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई आयोजक आणि आंदोलनकर्त्यांना करावी लागेल.नागरिकांनी हातात घातक शस्त्र, लाठी, तलवार, दगड, ज्वलनशील पदार्थ बाळगू नयेत. न्यायालयाच्या अटीशर्थीचे पालन करून त्यांना मोर्चाला समोर जावं लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!