पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा कारनामा ; त्याच्या अन बायकोच्या नावे चक्क 4 मतदान ओळखपत्र..


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा आणखीन एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे.घायवळ आणि त्याची पत्नी यांच्या नावाने २ वेगवेगळ्या शहरातून मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.यातील एक पुणे आणि दुसरे अहिल्यानगर येथील असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये गोळीबार आणि मारहाण प्रकरणामुळे निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण निलेश घायवळ फरार झाला असून तो लंडनला पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे. निलेश घायवळच्या अटकेसाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.अशातच आता घायवळ याची स्वतः त्याच्या आणि पत्नीच्या नावाने २ शहरात २ म्हणजे एकूण ४ मतदान ओळख पत्र आहेत. अशी माहिती समोर आली आहे.बनावट नोंदी आणि नावात फेरफार करून खोटे वय दाखवत हे ओळखपत्र काढून देण्यासाठी निलेश घायवळ आणि त्याच्या बायकोला कुणी मदत केली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ आणि त्याच्या संबंधित व्यक्तींचे बँक खाते आता पुणे पोलिसांनी गोठवले आहेत. पुणे पोलिसांनी निलेशच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!