ठाकरे गटातील गळती सुरूच! बड्या महिला नेत्याने सोडली साथ; थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश


मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक धक्का बसला असून, पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होत असून, शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षातील गळतीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली. आता शुभांगी पाटील यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धुळे येथून हजारो समर्थकांसह शुभांगी पाटील मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून शुभांगी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यांनी त्यावेळी या चर्चांचे खंडन केले होते. आता मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, यापूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी विकासनिधी मिळत नसल्याचे कारण देत शिंदे गटात प्रवेश केला होता. या घडामोडींनंतर आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!