उरुळी कांचनमधील वीज कर्मचाऱ्याचा अजब कारभार ! बंद सदनिकेत वीजमीटर दिला दुसऱ्याला वापरायला ! वीजबिलाचा दणका मात्र मूळ मालकाला…!


उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील महावितरणच्या कर्मचारी असलेल्या वायरमनने घरात कोणी राहत नसल्याची संधी साधत सदनिकेतील मीटर काढून परस्पर दुसऱ्याला वापरण्यासाठी दिला असल्याची अजब घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणामधील संबंधित घरमालक केतन दिलीप शाह (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दिली आहे. तसेच रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. तरीही लोणी काळभोर पोलीस व महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शाह यांची कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील गगन आकांक्षा इमारतीत एक सदनिका आहे. सुरुवातीला ते या ठिकाणी वास्तवास होते. मुलाचे शिक्षक झाल्याने सदरची सदनिका बंद होती. मात्र वीजमीटर सुरु होते. त्यामुळे महिन्याला येणारे ११० रुपयांचे वीजबिल ते नियमित भरीत होते.

याचदरम्यान, मागील तीन महिन्यांपूर्वी ५ हजार एवढे लाईट बिल आले त्यावेळेस त्यांनी ते भरले. मात्र पुन्हा तीन महिन्यांनी सदरचे लाईटबिल हे ७ हजार रुपये आल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी वीजमीटर मिळून आला नाही. वीज मीटरचे बिलिंग सायकल मासिक बदलल्याने वीज बिल तीन महिन्यांनी मिळाले. तांत्रिक विश्लेश्नाद्वारे तपास केला असता सदरचा मीटर हा साडे तीन किलोमीटर अंतरावर मिळून आला. याबाबत एका वायरमनला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच वीजमीटर हा कार्यालयात असल्याची माहिती दिली.

याबाबत शाह यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात व रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!