लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार…!
उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्याएका अट्टल गुन्हेगाराला पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे.
शुभम संजय धुमाळ (वय २२, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदीर, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी शुभम धुमाळ हा त्याच्या साथिदारांसह कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, नायगाव फाटा, पुणे सोलापुर रोड परिसरात वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करीत होता. त्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तसेच आरोपी शुभम धुमाळ याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख पाठविला होता.
सदर प्रस्तावाची पडताळणी करून उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी आरोपी शुभम धुमाळ यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातून २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक तेज भोसले यांनी केली आहे.