राज्य सरकारने कोर्टाला मृतदेह दफन करण्याची दिली ग्वाही! अक्षय शिंदेंच्या मृतदेह होणार या ठिकाणी दफन ….
मुंबई : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा (23 सप्टेंबर) पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत एन्काऊंटर झाला आहे. त्याला आता सात दिवस झाले आहे. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अजून ही जागा मिळालेली नव्हती.
राज्य सरकारने अक्षय शिंदेच्या अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली. त्यानुसार अक्षय शिंदेवर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पोलिसांनी त्याला दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खड्डा ही खोदण्यात आला आहे. अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला होता.
अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. यानंतर अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला आहे. याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावला आहे. तर दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या होत्या. पण अंतिमनिर्णय होवू शकला नाही. शेवटी पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कारकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दफन केलं जाणार आहे. त्याची सर्व तयारी पोलिसांनी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिदिच्या एन्काऊंटरचं लोकांनी समर्थन केलं. तर, समाजातील काही विचारवंत, वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धाव देखील घेतली. त्यामुळे, अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यंस्कार हादेखील गुंतागुंतीचा विषय बनला.
त्यातच, शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीने कबुली दर्शवण्यात आली होती. त्यामुळे, दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून सुरू होतं, अखेर हा शोध संपला असून अक्षय रिंदिवर 7 दिवसानंतर आता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.