पुण्यात वातावरण तापलं!शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर धारदार कोयत्याने वार, अद्यापही कारवाई नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह


पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना पुण्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवाराला पुण्यातील दौंड पोलीस ठाण्यासमोर कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे.या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आफताब सय्यद असं पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्याचे नाव आहे.याला भर चौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण वैयक्तिक कारणांवरून झाली असल्याचं समोर आलं आहे. सदर घटना दौंड पोलीस ठाण्यासमोरच घडली असू याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान या मारहाणीत आफताब सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत., एक मोठा जमाव या तरुणाला धक्काबुक्की करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. हा तरुण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार आफताब सय्यद आहे.नंतर या गुंडांनी आफताबला चौकाच्या मधोमध घेऊन बेदम मारहाण केली.

दरम्यान भर चौकात मारहाण आणि धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दौंड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!