बीडमध्ये वातावरण तापलं ; शरद पवारांच्या पक्षाच्या खासदाराची थेट निवडणूक अधिकाऱ्याला धमकी…..

बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका तोंडावर असताना सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दरम्यान बीडमध्ये राजकीय वातावरण चांगलं तापल आहे.बीड जिल्ह्यांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांलाच धमकी दिली आहे.परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिले आहेत. यातील दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते. हे अर्ज कोणाच्यातरी दबावाखाली अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.

परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार अपात्र ठरल्याने खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा लाट्या असा उल्लेख केला आहे.. फक्त हेच नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा त्यांनी अनेकदा एकेरी उल्लेखही केला. एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्या फॉर्मला वेगळा न्याय. लाटकर नावाचा आहे लाट्या.. किती दिवस झाले त्याला सांगितले… लोकसभेला तोच… विधानसभेला तोच… नगरपरिषदेला तोच… मनानं बदलून गेला तर ठीक नाही तर त्याचा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून तो करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ते.. एक फॉर्म यावर निरंक केलेला आहे तो बाद होतो.. दुसरा फॉर्म वैध होतो ते आम्ही कोर्टात प्रेझेंट करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. खासदार सोनवणे यांनी अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकार्यावर बोलण्याने तसेच एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

