हवामानात पुढचे 24 तास भयानक बदल! थंडीची लाट, वादळ आणि तुफान पाऊस

पुणे : गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत असतानाच हवामान खात्याने आता मोठा इशारा दिला आहे. कडाक्याच्या थंडीनंतर आता राज्यात भयानक वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने चार राज्यांसाठी जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट असताना आता हवामान खात्याने पुन्हा एकदा चार राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि कर्नाटकमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.. दरम्यान, या पावसामुळे उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होईल. पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 50 किलोमीटर असणार आहे.
दरम्यान पुढील दोन दिवसात पुणे शहरात थंडी ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील दोन-तीन दिवसात हवामानात बदल देखील होणार असून किमान तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या अनेक भागात किमान तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे.

दरम्यान गेल्या 24 तासात होणाऱ्या या भयानक वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
