मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात ; भरधाव ट्रकची बसला जोरदार धडक, चिमुकलीचा दुर्देवी अंत तर 20 जण जखमी..


पुणे: गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना समोर येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये आठ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रक चालकाच्या चुकीमुळे ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर आगाराची बस शिंदखेड्याच्या दिशेने निघाली होती. ती बस दाबाशी गावाजवळ आली असता, इंदोरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला तर 20 जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले.

दरम्यान घटनेची माहिती पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!