छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असताना छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकची धडक बसली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की, या अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला. 14 वर्षांची मुलगी, 12 वर्षांच्या मुलाचा त्यांच्या वडिलांसह मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचे मृतदेह काढण्यासाठी जेसीबीची वापर करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
Views:
[jp_post_view]