पुण्यात ओळखीचा गैरफायदा घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेचे ७३ तोळे आणि १७ लाख लुबाडले, पोलीस खात्याच्या प्रतिमेला काळा डाग…


पुणे : पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांनी ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेला ७३ तोळे सोने तर तिच्या कुटुंबीयांकडून 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक जगताप असे या गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

फिर्यादी महिला कोथरूडमध्ये राहते. फिर्यादी महिला आणि आरोपी जगताप यांची ओळख असल्याने या ओळखीचा गैरफायदा घेत जगतापने या महिलेच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेतली व त्यांची फसवणूक केली.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे बँकेतून कर्ज मिळत नाही. माझ्याकडे पाच किलो सोने आहे, परंतु हे सोने दुकानात गहाण आहे आणि बाजारात माझे एक कोटी रुपये गुंतले आहेत. माझ्या जमिनीचा व्यवहार झाला की, मी तुमचे पैसे आणि सोने परत करीन असे अमिष दाखवत त्याने या महिलेच्या कुटुंबीयांकडून व महिलेकडून सोने घेतले.

त्यानंतर आरोपीने आपण गुन्हे शाखेमध्ये फौजदार असून, सध्या मुलगी एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे, आणि पत्नीला कर्करोग झाला आहे, असे खोटे सांगत फिर्यादीकडून २०१९ ते २०२२ दरम्यान वेळोवेळी ७३ तोळे सोने घेतले आणि फिर्यादी महिलेच्या मुलाकडून आणि पतीकडून १७ लाख रुपयांची रोकड घेतली. ती परत केली नाही.

यासंदर्भात वेळोवेळी मागणी केल्यानंतर त्याने पैसे परत केले नसल्याने चतुशृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपासासाठी हा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्याचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!