Supriya Sule : अजित पवारांनी जिथून पहिली निवडणूक लढवली तिथूनच आता सुप्रिया सुळे उतरणार मैदानात, केली मोठी घोषणा…


Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटं पाडल्याचा दावा करत अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती साखर कारखान्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. संघर्ष करून, जिंकून कारखाना पुन्हा रुळावर आणण्याचा निर्धार त्यांनी कामगारांसमोर व्यक्त केला. Supriya Sule

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदावरून अजित पवार यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ज्या मूळ जागेवरून सुरू झाली, तिथूनच निवडून येण्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांत होत आहे. अशा स्थितीत सुप्रिया सुळे यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचं ठरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!